
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत मा. गटविकास अधिकारी यांनी आज ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यात आली. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. कामकाज अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामविकासासाठी प्रशासन व ग्रामपंचायत यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन मा. गटविकास अधिकारी यांनी केले. ग्रामस्थांनीही आपल्या अडचणी व सूचना मांडल्या.
या भेटीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply