
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आज ग्रामस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य, गावातील मान्यवर, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.
ग्रामविकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार करण्यात आला. “आपले गाव – आपली जबाबदारी” या भावनेतून ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Leave a Reply