
मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आज आपल्या गावात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांची रक्त तपासणी करण्यात आली तसेच आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन सभा घेण्यात आली.
या उपक्रमात अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हिमोग्लोबिन, रक्तदाब व इतर आवश्यक तपासण्या करून घेण्यात आल्या. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी महिलांना पोषण, स्वच्छता, नियमित तपासणीचे महत्त्व आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली.
आरोग्य विभागाच्या सभेत विविध शासकीय आरोग्य योजना, लसीकरण, मातृत्व आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाली. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज — हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Leave a Reply