
आज आपल्या गावात मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत श्रमदानातून गावभाग स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
गावातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आणि मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन कचरा संकलन, प्लास्टिक वेगळे करणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती केली.
या मोहिमेमुळे गाव अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविण्याचा संकल्प करण्यात आला. “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यात आला.

Leave a Reply